स्वच्छतेबाबत शेगाव संस्थानविषयी शरद पवारांकडून गौरवोदगार
By Admin | Updated: September 19, 2016 18:57 IST2016-09-19T18:57:08+5:302016-09-19T18:57:08+5:30
स्वच्छतेचे पटत असल्याने देशभरात ह्यस्वच्छ भारतह्ण चा गजर सुरु झाला असताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत

स्वच्छतेबाबत शेगाव संस्थानविषयी शरद पवारांकडून गौरवोदगार
गिरीश राऊत
बुलडाणा, १९ : स्वच्छतेचे पटत असल्याने देशभरात ह्यस्वच्छ भारतचा गजर सुरु झाला असताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत गौरवोदगार व्यक्त केले आहेत. राज्यात सर्वत्र सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने विराट मराठा क्रांती मूक मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येत मराठा समाज बांधव सहभागी होत आहेत. लाखोंचा सहभाग म्हटल्यावर विविध खाद्यपदार्थांचे तसेच पिण्याच्या पाण्याचे पाऊच, प्लास्टिक ग्लास व इतर कचरा होणारच. मात्र मोर्चामुळे कचरा होवून कोणाला उपद्रव होवू नये याची खास काळजी घेतल्या जात आहे. या स्वच्छता मोहीमेसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
या स्वयंसेवकांकडून पडता क्षणीच कचरा उचलण्यात येत आहे. हीच पध्दत शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असून त्याचाच आदर्श या मोर्चेकरींकडून घेतला जात आहे. या मोर्चा अनुषंगाने शनिवारी एका वृत्तवाहिनीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मुलाखत घेतली असता या मुलाखतीत त्यांनी संत गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत गौरवोदगार व्यक्त केले व हिच स्वच्छतेची काळजी मराठा क्रांती मूकमोर्चात घेतल्या जात असल्याला दुजोरा दिला. विशेष म्हणजे याआधी सुध्दा शेगाव भेटीदरम्यान जाहीरपणे शेगाव संस्थानमधील स्वच्छतेबाबत शरद पवारांनी गौरवोदगार काढले होते हे विशेष.