गर्भपात करणारी डॉक्टरच भरारी पथकात!
By Admin | Updated: May 28, 2017 00:53 IST2017-05-28T00:53:10+5:302017-05-28T00:53:10+5:30
जिन्सी रोडवर खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत गर्भपात केंद्राचा पोलिसांनी २४ मे रोजी छापा टाकून मुख्य सूत्रधार डॉ. चंद्रकला गायकवाडला अटक केली. डॉ. गायकवाड
गर्भपात करणारी डॉक्टरच भरारी पथकात!
- लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिन्सी रोडवर खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत गर्भपात केंद्राचा पोलिसांनी २४ मे रोजी छापा टाकून मुख्य सूत्रधार डॉ. चंद्रकला गायकवाडला अटक केली. डॉ. गायकवाड मागील एक वर्षापासून महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर डॉक्टर म्हणून कार्यरत होती. अलीकडेच महापालिकेने गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यासाठी पथक नेमले. त्यातही तिचा समावेश होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गायकवाडने महापालिकेत ३० वर्षांहून अधिक सेवा केली. आरोग्य विभागात असताना तिने बहुतांश सेवा जिन्सी परिसरातील आरोग्य केंद्रातच घालविली. २०१३ मध्ये ती निवृत्त झाली. १५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत शहरात धडक मोहीम राबवून सर्व प्रसूती रुग्णालयांची, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करावी, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने वेगवेगळी पथके स्थापन केली होती.
डॉ. अंजली पाथ्रीकर यांच्या पथकात डॉ. चंद्रकला गायकवाडचाही समावेश होता. तिनेही शहरातील गर्भपात केंद्रांची तपासणी केली. ही सर्व तपासणी सुरू असताना डॉ. गायकवाडचे अनधिकृत गर्भपात केंद्र सुरू असेल, असा संशय आला नाही.