शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

नामदेव शास्त्रींच्या सुबुद्धीसाठी मुंडे समर्थकांचा अभिषेक !

By admin | Updated: October 10, 2016 16:13 IST

भगवान गडावर वंजारी समाजाचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शंभू महादेवाने महंत नामदेव शास्त्री यांना सुबुद्धी दयावी, यासाठी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या सातारा जिल्ह्यातील

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 10  - भगवान गडावर वंजारी समाजाचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शंभू महादेवाने महंत नामदेव शास्त्री यांना सुबुद्धी दयावी, यासाठी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या सातारा जिल्ह्यातील समर्थकांनी आज शिखर शिंगणापृरला अभिषेक घातला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आसमंत दणाणून सोडला. त्यानंतर हे कार्यकर्ते भगवानगडाला रवाना झाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे सातारा जिल्ह्यातील रासपाचे नेते महादेव जानकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर शंभू महादेवाच्या मंदिरातील पिंडीसमोर अनेकदा मुंडे कुटुंबीय नतमस्तक झाले आहेत. 'भगवानगड हा वंजारी समाज अन् मुंडे कुटुंबीयासाठी श्रद्धास्थान आहे. येथील महंत नामदेव शास्त्री व पंकजा ताई यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे वंजारी समाजासह इतर समाज दुखावला गेला आहे. आतातरी भगवानगडावरील महंत नामदेव शास्त्री यांना शंभू महादेवाने सुबुद्धी द्यावी, यासाठी आज शिखर शिंगणापूरला दुध, दही, साखर अन् पाणी यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी ढोल वाजवून श्री शंभू महादेवाला साकडेही घालण्यात आले,' अशी माहिती मुंडे समर्थक डॉ. प्रसाद ओंबासे व् दत्ता खाडे यांनी दिली. यावेळी दीडशे ते दोनशे भक्तांनी भगवान गडावरील वाद लवकर मिटावा व समाज पुन्हा एकदा इनामेइतबारे एकत्र यावा, अशी प्रार्थथनाही केली. यावेळी प्रमोद खाडे, सतीश जानकर, दिलीप माळवे, नाथा काळेल, बाळराजे वीरकर आणि रविंद्र खाडे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.