नामदेव शास्त्रींच्या सुबुद्धीसाठी मुंडे समर्थकांचा अभिषेक !
By Admin | Updated: October 10, 2016 16:13 IST2016-10-10T16:13:59+5:302016-10-10T16:13:59+5:30
भगवान गडावर वंजारी समाजाचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शंभू महादेवाने महंत नामदेव शास्त्री यांना सुबुद्धी दयावी, यासाठी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या सातारा जिल्ह्यातील

नामदेव शास्त्रींच्या सुबुद्धीसाठी मुंडे समर्थकांचा अभिषेक !
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 10 - भगवान गडावर वंजारी समाजाचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शंभू महादेवाने महंत नामदेव शास्त्री यांना सुबुद्धी दयावी, यासाठी मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या सातारा जिल्ह्यातील समर्थकांनी आज शिखर शिंगणापृरला अभिषेक घातला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आसमंत दणाणून सोडला. त्यानंतर हे कार्यकर्ते भगवानगडाला रवाना झाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे सातारा जिल्ह्यातील रासपाचे नेते महादेव जानकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर शंभू महादेवाच्या मंदिरातील पिंडीसमोर अनेकदा मुंडे कुटुंबीय नतमस्तक झाले आहेत.
'भगवानगड हा वंजारी समाज अन् मुंडे कुटुंबीयासाठी श्रद्धास्थान आहे. येथील महंत नामदेव शास्त्री व पंकजा ताई यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे वंजारी समाजासह इतर समाज दुखावला गेला आहे. आतातरी भगवानगडावरील महंत नामदेव शास्त्री यांना शंभू महादेवाने सुबुद्धी द्यावी, यासाठी आज शिखर शिंगणापूरला दुध, दही, साखर अन् पाणी यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी ढोल वाजवून श्री शंभू महादेवाला साकडेही घालण्यात आले,' अशी माहिती मुंडे समर्थक डॉ. प्रसाद ओंबासे व् दत्ता खाडे यांनी दिली.
यावेळी दीडशे ते दोनशे भक्तांनी भगवान गडावरील वाद लवकर मिटावा व समाज पुन्हा एकदा इनामेइतबारे एकत्र यावा, अशी प्रार्थथनाही केली. यावेळी प्रमोद खाडे, सतीश जानकर, दिलीप माळवे, नाथा काळेल, बाळराजे वीरकर आणि रविंद्र खाडे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.