शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई कबड्डी: महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा सत्कार, प्रत्येकी सात लाखाचा धनादेश सूपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 16:18 IST

आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा क्रीडा मंत्री  विनोद तावडे यांच्या हस्ते आज मंत्रालयात सत्कार करण्यात आला.

मुंबई  : आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज मंत्रालयात सत्कार करण्यात आला. सायली जाधव यांना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.

कर्णधार म्हात्रे व जाधव यांनी आज क्रीडा मंत्री तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी या दोघींना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी सात लाख रुपयांचा धनादेश आणि शाल देवून तावडे यांनी सत्कार केला. 

सायली जाधव यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा उचित गौरव राज्य शासन करत आहेत. विविध पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांच्या खेळाचे तावडे यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या या दोन्ही कबड्डीपटूंना आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धेमध्ये जी संधी मिळाली त्या संधीचे त्यांना विजयामध्ये रुपांतर केले आणि केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे नाव कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले या शब्दात तावडे यांनी त्यांचा गौरव केला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे