शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिजीत बिचुकलेला तिसऱ्या गुन्ह्यात अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 20:36 IST

दहा वर्षांपूर्वी पोस्टमनला मारहाण केल्याचा आरोप

सातारा : धनादेश न वटल्याने बिग बॉसमधून पोलिसांनी अटक केलेल्या अभिजीत बिचुकले (रा. केसरकर पेठ, सातारा) याच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपता संपेनासे झाले आहे. खंडणीच्या गुन्ह्यानंतर आता दहा वर्षांपूर्वी पोस्टमनला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी बिचुकलेला शनिवारी अटक केली. यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.२८ हजारांचा धनादेश न वटल्याने अभिजीत बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी बिग बॉसमधून अटक केली होती. जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी पोलिसांनी पूर्वी दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली. या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश देण्यात आले. बिचुकलेने जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर १८ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीची तारीख शनिवार, दि. ६ रोजी असल्यामुळे त्याला कळंबा कारागृहातून जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी खंडणीच्या खटल्यातील फिर्यादी फिरोज पठाण यांची महत्त्वपूर्ण साक्ष झाली. बिचुकले याने खंडणीचे पैसे मागितले नाहीत, असा कुठलाही प्रकार घडला नाही, अशी साक्ष पठाण यांनी दिली. अगोदरच तयारीने आलेल्या पोलिसांनी ही सुनावणी झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या ३५३ (शासकीय कामात अडथळा) गुन्ह्यात अभिजीत बिचुकलेला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने या गुन्ह्यातही बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सोमवार, दि. ८ रोजी खंडणीच्या प्रकरणातील सुनावणी होणार असून, अभिजीत बिचुकलेच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर हे काम पाहत आहेत.

काय आहे प्रकरण ?२४ डिसेंबर २००९ रोजी पोस्टमन बाळाराम दादू घाडगे (वय ५९, रा. सदर बझार सातारा) हे गुरुवार पेठ परिसरामध्ये टपाल वाटत होते. त्यावेळी राहुल दिगंबर मोरे (रा. गुरुवार पेठ, सातारा) याने पोस्टमन घाडगे यांना अडवले. ‘आमचे पत्र आले आहे, ते द्या,’ अशी मागणी त्यांच्याकडे केली. परंतु घाडगे यांनी ‘तुमचे पत्र माझ्याजवळ  नाही. तुम्ही पोस्टात जाऊन चौकशी करा,’ असे सांगितले. यावरून त्याने घाडगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याकडे दुर्लक्ष करून ते पुढे जात असताना तेथे अभिजीत बिचुकले आला. या दोघांनी पोस्टमन घाडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली पत्रे रस्त्यावर फेकून दिली. या घटनेनंतर घाडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात राहुल मोरे, अभिजीत बिचुकले आणि अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल केला होता. 

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेBigg Boss Marathiबिग बॉस मराठी