महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेची "हिंदकेसरी"च्या फायनलमध्ये धडक
By Admin | Updated: April 30, 2017 20:53 IST2017-04-30T20:53:09+5:302017-04-30T20:53:09+5:30
महाराष्ट्राचा पैलवान अभिजीत कटकेनं हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेची "हिंदकेसरी"च्या फायनलमध्ये धडक
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - महाराष्ट्राचा पैलवान अभिजीत कटकेनं हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. परतीच्या उपांत्य सामन्यात अभिजीतनं क्रिशन कुमारला 8-2 असे धुळ चारली. अंतिम सामन्यात अभिजीतचा सुमितविरोधात सामना होणार आहे. याआधी सुमितनेच पहिल्या उपांत्य सामन्यात अभिजीतला हरवले होते. त्यामुळ अंतिम सामना अटीतटी असणार आहे.
अभिजीत कटके हा मूळचा पुण्याचा असून, यंदा महाराष्ट्र केसरीत त्याने उपविजेतेपद पटकावले होते. त्यामुळे आता हिंदकेसरी स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. परतीच्या उपांत्य लढतीत अभिजीतचा प्रतिस्पर्धी क्रिशननं पहिल्या उपांत्य सामन्यात जोगिंदरवर मात केली होती.
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं सारसबागेतील सणस मैदानात हिंदकेसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन स्टाईल रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यताही आहे.