शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अभय कुरुंदकर, फळणीकर यांच्या घरावर छापे, मदत करणारे दोघे पोलीस रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 16:57 IST

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणात संशयित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि साक्षीदार महेश फळणीकर यांच्या घरावर मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी छापे टाकून महत्वाचे धागेदोरे ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअभय कुरुंदकर, फळणीकर यांच्या घरावर छापेअश्विनी बिद्रे खून प्रकरण मदत करणारे दोघे पोलीस रडारवर, कोल्हापूर पोलीस दलात खळबळ

कोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणात संशयित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि साक्षीदार महेश फळणीकर यांच्या घरावर मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी छापे टाकून महत्वाचे धागेदोरे ताब्यात घेतले.

महेश फळणीकर याच्या आजरा येथील घरावरही या पथकाने छापा टाकला.

मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अश्विनी बिद्रे खून प्रकरणाच्या तपासासाठी सध्या कोल्हापूरात ठाण मांडले आहे. शनिवारी या गुन्ह्याच्या प्रमुख तपास अधिकारी संगिता शिंदे-अल्फान्सो यांनी कोल्हापूरातील राजेंद्रनगर एसएससी बोर्ड परिसरातील अभय कुरुंदकर याच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर महेश फळणीकर याच्या आजरा येथील घरावरही या पथकाने छापा टाकला.तपास पथकाला या दोन्ही ठिकाणी मह त्वाचे धागेदोरे हाती आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी या तपासपथकाने कंबर कसली असून त्यांनी कोल्हापूर परिसरात ठाण मांडले आहे. तपास अधिकारी संगिता शिंदे-अल्फान्सो यांच्यासह या तपास पथकामध्ये सातजणांचा समावेश असून ते कसून तपास करीत आहेत.दरम्यान, दोन वर्षापूर्वी अभय कुरुंदकरच्या संपर्कात असलेल्या कोल्हापूर पोलीस दलातील दोघा पोलिसांनी त्याला मदत केल्याचा संशय आहे. हे दोघेही पोलिस कर्मचारी मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचे दोन वर्षांपासूनचे कॉल डिटेल्स तपासले जात असून मोबाईल कॉल रेकॉर्डिंग केले जात आहेत.

मृत अश्विनी बिद्रे यांना कुरुंदकर कोल्हापुरात फ्लॅट घेऊन देणार होता, त्यासाठी फ्लॅट पाहून त्याचा व्यवहार करून देण्याची जबाबदारी संबंधित दोन पोलीस कर्मचारी करणार होते. या धक्कादायक माहितीमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.अभय कुरुंदकरचा पोलीस दलात चांगलाच वचक होता. कोल्हापूर पोलीस दलातील अनेक पोलीस त्याच्या संपर्कात असायचे. गेल्या दोन वर्षांत कुरुंदकरच्या मोबाईल कॉल डिटेल्समध्ये कोल्हापुरातील दोघा पोलिसांना वारंवार फोन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांचा संवाद काय झाला. बिद्रे खूनप्रकरणात त्यांचा सहभाग आहे काय? अशा शंका पुढे आल्याने या दोघा पोलिसांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस