आबांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर
By Admin | Updated: January 20, 2015 02:23 IST2015-01-20T02:23:42+5:302015-01-20T02:23:42+5:30
राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यात सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही, अशी माहिती लीलावती रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
आबांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यात सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही, अशी माहिती लीलावती रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून आर. आर. पाटील यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांत त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत आहेत. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. (प्रतिनिधी)