शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

अब्दुल सत्तार अडचणीत, गायरान जमिनीच्या वाटपावरून अजित पवारांचे गंभीर आरोप, राजीनाम्याची केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:29 IST

Ajit Pawar Allegations on Abdul Sattar : आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. गायरान जमितीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे.

नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादळी झाली आहे. आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. गायरान जमितीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे. तसेच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. जर अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणात राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

शिंदे सरकारमधील कृषिमंत्री आणि आधीच्या सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अजित पवार यांनी गंभीर आरोप केले. अजितदादा म्हणाले की, तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनी वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करणारा होता. या प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवलं. तसेच तत्कालिन महसूल राज्यमंत्र्यांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असतानाही महसूल राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा दावा अजित पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, महसूलमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना  महसूल राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध वाटल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. तोपर्यंत राज्यात सत्तांतर होऊन हे शिंदे सरकार सत्तेवर आलं होतं. या पत्रातून वादग्रस्त आदेशाची अंमलजबाणी केल्यास सुप्रिम कोर्टाचा अनादर होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं होत. तसेच योग्य दिशानिर्देश देण्याची मागणी केली होती. मात्र माझ्या माहितीप्रमाणे या पत्रावर अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. ही जमीन ३७ एकर असून, त्याची दिडशे कोटी रुपये एवढी किंमत आहे. ही वाशिमला लागून आहे. या प्रकरणात महसूल राज्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय, राज्य सरकारचा निर्णय सर्व बाबी समोर असताना त्यांनी एका व्यक्तीला फायदा मिळवून दिला. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे महसूलराज्य मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.  

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे