शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तार... नया है वह! फडणवीस आणि राऊतांचे एकमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 08:48 IST

पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. जे सेनेत जन्माला आले नाहीत, त्यांना पुढची किमान २० वर्षे शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडींविषयी बोलले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे अनेक विषयात दुमत असले तरी अब्दुल सत्तारांविषयी मात्र एकमत झाल्याचे चित्र आहे. सत्तार यांच्या विधानांवर दोन्ही नेत्यांनी ‘नया है वह’चा सूर आळवला आहे. 

शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना - भाजप युतीबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युतीचा पूल उभारू शकतील, असे म्हटले होते. यावर फडणवीस आणि राऊत या दोन्ही नेत्यांनी जवळपास सारखीच प्रतिक्रिया दिली आहे. सत्तारांच्या विधानाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. ते युती घडवून आणू शकतात, असे सत्तारांना वाटते,  पण सत्तार नया है वह. त्यांना शिवसेनेचे काहीच माहीत नाही. मला वाटते गेल्या पाच - सात महिन्यांत ते कधी उद्धव ठाकरे यांनाही भेटले नसतील. युतीबाबत बोलायला कोणी महत्त्वाचा माणूस लागतो ना, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. 

तर, युतीबाबत कोण बोलत आहे, कोणी प्रमुख नेता बोलतोय का, हे आधी तपासून घ्या, असे राऊत म्हणाले. सत्तार अजून शिवसेनेत नवे आहेत. हे जे मंत्री आहेत, त्यांनी पक्षात २५ वर्ष पूर्ण केली, तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्ण लागायची आहे. दुसरे कोणी प्रमुख लोकांपैकी बोलत आहे का, असा प्रश्न करत सत्तार यांची विधाने संजय राऊत यांनी निकाली काढली.

पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. जे सेनेत जन्माला आले नाहीत, त्यांना पुढची किमान २० वर्षे शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडींविषयी बोलले पाहिजे. सत्तार काँग्रेसमधून आले आहेत. हळूहळू रुळत आहेत. अशी विधाने करून अकारण विरोधी पक्षाच्या हातात कोलीत मिळेल, वाद निर्माण होतील, असे कोणी करू नये, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारSanjay Rautसंजय राऊत