शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 00:22 IST

बंगळुरू - राज्यासह देशभरात  गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती चिंताजनक आहे.  तेलगी गेल्या 11 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. काही प्रसारमाध्यमांनी त्याचा मृत्यू झाला नसून त्याल व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे म्हटले आहे.  अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र तेलगीच्या जावयाने त्याच्या ...

बंगळुरू - राज्यासह देशभरात  गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती चिंताजनक आहे.  तेलगी गेल्या 11 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. काही प्रसारमाध्यमांनी त्याचा मृत्यू झाला नसून त्याल व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे म्हटले आहे.  अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र तेलगीच्या जावयाने त्याच्या मृत्यूचे वृत्त फेटाळले आहे.  अब्दुल करीम तेलगी हा मुळचा कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील रहिवासी आहे. 80 च्या दशकात तो रेल्वेस्टेशनवर शेंगदाणे विकून आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्यानंतर त्याने बनावट स्टॅम्प पेपर विक्री सुरू केली.  2001 साली नोव्हेंबरमध्ये  त्याला अटक करण्यात आली होती. 2002-03 च्या दरम्यान बनावट स्टॅम्प पेपर रॅकेट प्रकरणी विशेष तपास पथकाने अनेक दूरध्वनींवर त्याचे संभाषण टेप केले होते. त्यानंतर कोट्यवधीच्या स्टॅम्पपेपर घोटाळ्या प्रकरणी तेलगीला दोषी ठरवण्यात आले होते. 

बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणी न्यायालयाने 2007 साली तेलगी याला 30 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार तेलगी आपल्या एजंटांसोबत मिळून बनावट स्टॅम्प पेपर बनवत असे. त्यानंतर हे स्टॅम्प पेपर बँका, वीमा कंपन्या आणि ब्रोकरेज फर्म्सना विक्री केले जात. 

कारावासाबरोबरच तेलगीवर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात 7 जून 2003 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये तेलगीने सनसनाटी खुलासे केले होते. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथून 2200 कोटी आणि कफ परेड येथून 800 कोटी रुपायांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त केले होते. त्यानंतर तेलगीविरोधात देशभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. 

टॅग्स :Deathमृत्यू