डेव्हिड हेडलीची 4 दिवस उलट तपासणी करण्याची अबु जुंदालच्या वकिलाची मागणी
By Admin | Updated: February 22, 2016 16:57 IST2016-02-22T16:57:24+5:302016-02-22T16:57:24+5:30
दहशतवादी हल्याचा प्रमुख आरोपी अबु जुंदालच्या वकिलांनी न्यायालयाकडे डेव्हिड हेडलीची उलट तपासणी करण्यासाठी चार दिवस मागितले आहेत

डेव्हिड हेडलीची 4 दिवस उलट तपासणी करण्याची अबु जुंदालच्या वकिलाची मागणी
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 22 - मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडली याची उलट तपासणी चार दिवस चालू शकते. दहशतवादी हल्याचा प्रमुख आरोपी अबु जुंदालच्या वकिलांनी न्यायालयाकडे डेव्हिड हेडलीची उलट तपासणी करण्यासाठी चार दिवस मागितले आहेत.
जुंदालचे वकील अब्दुल वाहब खान यांनी मुंबई दहशतवादी हल्याप्रकरणी डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार करण्यावर आक्षेप घेतला असून याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काही कागदपत्रे आणि सीडींचीदेखील याचिकेमार्फेत मागणी केली आहे.
दरम्यान न्यायाधीश जी ए सानप यांनी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांना अमेरिकन अधिका-यांशी संपर्क साधून डेव्हिड हेडलीला पुन्हा कधी बोलावू शकतो याची माहिती घेण्यास सांगितले आहे. 25 फेब्रुवारीपर्यत न्यायालयाला याची माहिती द्यायची आहे. डेव्हीड हेडलीच्या उपलब्धतेची माहिती मिळाल्यानंतर न्यायालय पुढील तारखा ठरवू शकते.