सेनामंत्र्यांचा अबोला

By Admin | Updated: June 22, 2015 03:17 IST2015-06-22T03:17:04+5:302015-06-22T03:17:04+5:30

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.

From Abantika | सेनामंत्र्यांचा अबोला

सेनामंत्र्यांचा अबोला

संदीप प्रधान, मुंबई
शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमधील परस्पर संवादाच्या अभावामुळे पक्षातील अनेक जण अस्वस्थ असून, मित्रपक्ष भाजपालाही सेना मंत्र्यांनी धरलेल्या ‘अबोल्या’मुळे डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात आपापसात संवाद फारच कमी असल्याचे शिवसेनेच्याच काही मंत्र्यांचे मत आहे. मंत्रिमंडळ बैठकीकरिता एकमेकांच्या शेजारी बसूनही ते फारसे बोलत नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकत्र
बसून स्ट्रॅटेजी पक्की करणे हे तर होतच नाही. मागील सरकारमध्ये कुठली भूमिका घ्यायची किंवा एखादा ताजा विषय कसा व कुणी उपस्थित करायचा याची व्यूहरचना निश्चित करीत. शिवसेनेत ज्येष्ठ मंत्र्यांमध्येच विसंवाद असल्याने अशी ठरवून भूमिका घेतली जात नाही.
रावते व कदम हे दोघे विधान परिषदेचे सदस्य आहेत. रामदास कदम हे विधान परिषदेचे सदस्य झाल्यापासून उभयतांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला. निवडणुकीत सुभाष देसाई हे पराभूत झाले. त्यानंतरही त्यांना मंत्री केले व उद्योगासारखे सर्वांत महत्त्वाचे खाते दिल्याने रावते व कदम हे देसाई यांच्यावर नाराज आहेत. भाजपासोबतच्या वाटाघाटींमध्ये देसाईच सहभागी होत असल्याने तो मंत्र्यांमधील कटुतेचा पदर आहे.

Web Title: From Abantika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.