आरे गोळीबार ; एकाला अटक

By Admin | Updated: May 25, 2015 03:57 IST2015-05-25T03:57:58+5:302015-05-25T03:57:58+5:30

शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे चिटणीस श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांची सुपारी घेणाऱ्याला आरे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अमित तळेकर या इसमाला ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे

Aare firing; One arrested | आरे गोळीबार ; एकाला अटक

आरे गोळीबार ; एकाला अटक

मुंबई : शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे चिटणीस श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांची सुपारी घेणाऱ्याला आरे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अमित तळेकर या इसमाला ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. मात्र ही सुपारी देणारा खरा मास्टर माइंड अद्याप फरार असून, त्याचाही गाशा गुंडाळण्यात पोलिसांना लवकरच यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अमितच्या मोबाइल सीडीआरमधून पोलिसांना विनोद नावाच्या एका व्यक्तीचा नंबर मिळाला आहे, ज्याच्या अमित सतत संपर्कात होता. त्यानुसार गोरगाव परिसरातून पोलिसांनी विनोदला अटक केली. चौकशीमध्ये फिल्म सिटी परिसरात सेट लावणाऱ्या एका गायकवाड नावाच्या व्यक्तीशी शिंदे यांचे वाद होते आणि त्यानेच विनोदाला सुपारी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: Aare firing; One arrested