महाराष्ट्रातून ‘आप’ची माघार ?

By Admin | Updated: July 1, 2014 01:43 IST2014-07-01T01:43:14+5:302014-07-01T01:43:14+5:30

हाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा विचार आम आदमी पार्टीत (आप) सुरू असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रंनी दिली.

AAP's withdrawal from Maharashtra? | महाराष्ट्रातून ‘आप’ची माघार ?

महाराष्ट्रातून ‘आप’ची माघार ?

>मुंबई : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा विचार आम आदमी पार्टीत (आप) सुरू असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रंनी दिली.
 हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढविण्याऐवजी दिल्लीवर लक्ष केंद्रित करावे, असे अरविंद केजरीवाल यांना वाटते. केजरीवाल यांनी गुगल हँगआऊटद्वारे पक्ष कार्यकत्र्याशी संवाद साधताना ‘आप’ने हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणूक लढवू नये, असे वाटते. आपल्या कार्यकत्र्यानी संपूर्ण लक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत करावे, असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने महाराष्ट्रातील 48 पैकी 28 जागांवर निवडणूक लढविली होती. मात्र एकाही पक्षाला जागेवर यश मिळाले नाही. ‘आप’च्या बहुसंख्य उमेदवारांची अनामत रक्कमही लोकसभा निवडणुकीत जप्त झाली. पक्षाला हरियाणातही अपेक्षित यश मिळाले नाही. पंजाबमध्ये मात्र ‘आप’ने अनपेक्षितपणो चार जागा जिंकल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळविलेल्या ‘आप’ला लोकसभा निवडणुकीत मात्र विधानसभेच्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. सातही जागांवर पक्षाचे उमेदवार दुस:या स्थानावर राहिले.  

Web Title: AAP's withdrawal from Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.