‘आप’ला महाराष्ट्रातही पडले भगदाड! ३७६ कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे
By Admin | Updated: May 5, 2015 02:14 IST2015-05-05T02:14:43+5:302015-05-05T02:14:43+5:30
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षांतर्गत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करीत ‘आप’च्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आज

‘आप’ला महाराष्ट्रातही पडले भगदाड! ३७६ कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे
मुंबई : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षांतर्गत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करीत ‘आप’च्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आज राजीनामास्त्र उपसले. मुंबई, पुण्यासह राज्यातील कार्यकर्त्यांनी एकाचवेळी राजीनामे सादर केल्याने महाराष्ट्रातही ‘आप’ला भगदाड पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
केजरीवाल व त्यांच्या भोवतालच्या कंपूने हुकूमशाही पद्धतीने कारभार चालविल्याचा आरोप करीत पक्षाचे पुण्यातील नेते मारुती भापकर यांच्यासह ३७६ कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. काही दिवसांपूर्वी ‘आप’मधून हकालपट्टी करण्यात आलेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी सुरू केलेल्या ‘स्वराज’ अभियानाला या सर्वांनी पाठिंबा दिला आहे. यापुढे स्वराज अभियानासाठी काम करणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.