रस्ते सुरक्षा मोहिमेतूनही आमीर खान बाहेर!
By Admin | Updated: January 11, 2016 13:17 IST2016-01-11T03:24:00+5:302016-01-11T13:17:27+5:30
असहिष्णुतेसंबंधी वादग्रस्त विधान केल्यामुळे सरकारचा तीव्र रोष पत्करणारा अभिनेता आमीर खान याला ‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेतून वगळण्यात आले आहे.

रस्ते सुरक्षा मोहिमेतूनही आमीर खान बाहेर!
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
असहिष्णुतेसंबंधी वादग्रस्त विधान केल्यामुळे सरकारचा तीव्र रोष पत्करणारा अभिनेता आमीर खान याला ‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेतून वगळण्यात आले आहे. अलीकडेच सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने ‘अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पद काढून घेतले होते. आता
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवित दुसरा हादरा दिला आहे. त्याच्याऐवजी आता महानायक अमिताभ बच्चनला करारबद्ध केले जाणार आहे.
२०१४मध्ये केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आमीर खान याला महत्त्वाकांक्षी रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी करारबद्ध केले होते. त्याच्या वाढत्या मागण्या पाहता त्या वेळी वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी आमीरला करारबद्ध करण्यास उत्सुक नव्हते, मात्र ‘सत्यमेव जयते’च्या यशामुळे प्रभावित होऊन गडकरींनी त्याचीच निवड करण्यावर भर दिला होता. आमीर अतिशय व्यग्र असल्यामुळे वाटाघाटी आणि रस्ते वाहतुकीच्या व्यापक जाहिरात कार्यक्रमांसाठी वेळ देऊ शकत नव्हता.