शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार केवळ आदेश काढण्यापुरते नाही; पीओपी मूर्तीवरून हायकोर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:46 IST

पीओपी मूर्ती विक्रीबंदीबाबतच्या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सरकारला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देवी-देवतांच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे दरवर्षी आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सचिवालयातून केवळ परिपत्रके काढली जातात. पण, अंमलबजावणीकडे कोणाचेही लक्ष नसते.  राज्य सरकार केवळ आदेश काढण्यापुरते नाही. पालिका आदेशांचे पालन करीत नसतील, तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने सरकारला पीओपी मूर्ती विक्रीबंदीबाबतच्या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाचे पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घालण्याचे स्पष्ट आदेश असतानाही गणेशोत्सवात आणि नवरात्रोत्सवातही पीओपीच्या मूर्तींची विक्री करण्यात आली. संबंधित पालिकांनी काहीही कारवाई केली नाही, अशी माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्या वकील रोनिता भट्टाचार्य यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काही कारवाई केली नसल्याचे समजताच खंडपीठाने त्यांच्या वकिलांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी पीओपी बंदीसंबंधी आदेश काढण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. पीओपीसाठी पालिका परवानगी देते. त्यामुळे आदेश काढण्याचे काम आमच्या अखत्यारित येत नाही, असे एमपीसीबीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

खंडपीठ काय म्हणाले?

दरवर्षी सचिवालयातून केवळ परिपत्रक काढण्यात येते. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जाते की नाही, याकडे कोणाचेही लक्ष नसते. राज्य सरकार केवळ आदेश काढण्यापुरते नाही. पालिका दिलेल्या आदेशांचे पालन करीत नसतील तर त्यांच्यावर काय कारवाई होते? असे सवाल करत न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच केवळ मुंबई, ठाणे, नाशिक आणि मिरा-भाईंदर या चारच महापालिकांचे वकील उपस्थित असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार