शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, सर्व दरवाजे खुले; महाराष्ट्रातील पावसाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:26 IST

दरवाजे बंद केलेल्या दिवशीच फुल्ल होणार

कोल्हापूर : तळकोकण, पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस आहे. यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. एकूण ५१९.६० मीटरपैकी रविवारी ५१७.९४ मीटरपर्यंत पाणी साठा झाला आहे. धरणातील पाणी पातळी ओव्हर फ्लोच्या दिशेने सुरू आहे. मात्र सध्या धरणाचे सर्व २६ दरवाजे उघडले आहेत. दरवाजे बंद केलेल्या दिवशीच धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. मात्र महाराष्ट्रातील जलसंधारण विभागाने पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा कायम ठेवल्याने अजूनही पाण्याचा विसर्ग १ लाख २० हजार क्युसेक सुरू आहे.कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. कृष्णा नदी (कल्लोळ बॅरेज) आणि घटप्रभा नदीतून (लोळसूर ब्रिज) पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे अलमट्टी धरणात ९२ हजार ७५० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर अलमट्टी पाण्याचा फुगवट्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होते. म्हणून राज्यातील जलसंधारण विभाग अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग एक लाखांवर ठेवण्यासाठीचा दबाव कायम ठेवला आहे. कर्नाटक सरकारही एक लाख २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ठेवला आहे. सध्या उत्तर कर्नाटक, अलमट्टी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस नाही. मात्र महाराष्ट्रातील पाऊस असल्याने अलमट्टीत पाण्याचा आवक वाढली आहे.