शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:44 IST

"कुणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल आणि तोच मराठी मुलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ..."

महाष्ट्रांतील शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले होते. सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यानंतर, राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. यानंतर, ठाकरे बंधूंचा अर्थात मनसे आणि शिवसेनेचा (ठाकरे गट) पूर्व नियोजित ५ जुलैचा मोर्चा रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी विजयी मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मेळाव्यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं"  -उद्या वरळीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मिळावा घेत आहेत, असे विचारले असता फडणवीस म्हणाले. "त्यांनी नक्कीच विजयी मेळावा घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण, यामागची भूमिकाही त्यांनी लक्षात घ्यायला हवी. कमिटी तयार करणारे तेच, त्या कमिटीत आपल्या उपनेत्याला टाकणारे तेच, त्या कमीटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासून ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा, हे कॅबिनेटमध्ये घेणारे तेच, कॅबिनेटचा निर्णय करणारे तेच, निर्णयावर स्वाक्षरी करणारे तेच, मिरिटवर स्वाक्षरी करणारेही तेच आणि विजयी मेळावा घेणारेही तेच. मला असं वाटतं की, मराठी माणसाला हे लक्षात येतं, कोण दुटप्पी आहे? हे दुटप्पी धोरण आहे." 

जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल... -फडणवीस पुढे म्हणाले, "आमचा विषय पक्का आहे. आम्ही समिती केली आहे. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तो निर्णय आणची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू. कुणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल आणि तोच मराठी मुलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ.  

  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhindiहिंदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेStudentविद्यार्थीPoliticsराजकारण