शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या मार्गाने खूप काही गमावले, मुख्य प्रवाहात या, आत्मसमर्पित माओवादी नेता 'भूपती'चे भावनिक आवाहन

By संजय तिपाले | Updated: November 19, 2025 11:02 IST

Gadchiroli Naxal News: आत्मसमर्पित माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने १९ रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. 'बंदुकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात या', असे भावनिक आवाहन त्याने केले आहे. 

गडचिरोली -  माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा  सदस्य व जहाल नक्षल कमांडर माडवी हिडमा, पत्नी राजे उर्फ राजक्का आणि इतर चार माओवादी १८ नोव्हेंबरला छत्तीसगड- आंध्रप्रदेश सीमेवर चकमकीत ठार झाले. माओवादी चळवळीला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सुरक्षा दलाच्या या कारवाईनंतर आत्मसमर्पित माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने १९ रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. 'बंदुकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात या', असे भावनिक आवाहन त्याने केले आहे. 

शेकडो जवान व निष्पाप नागरिकांच्या हत्येचा मास्टमाईंड व पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीचा प्रमुख जहाल नेता माडावी हिडमा याला आंध्रप्रदेशच्या अल्लुरी सीमेवरील सीतारामजू जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा यंत्रणेनेे कंठस्नान घातले. माओवादविरुध्द लढाईतील ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जाते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर   सीपीआय (माओवादी) चा माजी प्रवक्ता व सर्वोच्च नेता असलेल्या वेणुगोपाल उर्फ भूपतीने जुन्या साथीदारांना थेट आणि भावनिक आवाहन करत  'हिंसा सोडा, संविधानाचा मार्ग स्वीकारा'  असे सांगितले आहे.

सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्याने स्पष्ट केले. 'बंदुकीच्या मार्गाने काही साध्य झाले नाही; फक्त जीव गमावले जात आहेत. जग प्रगती करत आहे, देश बदलत आहेे. संविधानातच शक्ती आहे, बंदुकीत नाही,  असे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले. दीर्घ लढ्याची   अनुभूती सांगताना तो म्हणतो, आता लोकांच्या प्रश्नांसाठी घटनात्मक चौकटीतूनच लढा द्यावा लागणार आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याने इच्छुक माओवादी कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधण्यासाठी पुन्हा आपला मोबाईल क्रमांक जाहीर करत,   मुख्य प्रवाहात यावे, असे खुले आवाहन केले.

'भूपती'ने ६० सहकाऱ्यांसह केले होते आत्मसमर्पण१५ ऑक्टोबर रोजी माओवादी नेता भूपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली येथे आपल्या ६० सहकाऱ्यांसह माओवादी चळवळीतील प्रवासाला पूर्णविराम देत संविधानाचा मार्ग स्वीकारला होता. महाराष्ट्रात माओवादाविरुध्दच्या लढाईतील हे सर्वांत मोठे आत्मसमर्पण मानले जात आहे. यानंतर छत्तीसगडमध्येही शेकडो माओवाद्यांनी शस्त्र सोडत मुख्य प्रवाहात येणे पसंत केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Surrender: Maoist leader Bhupathi urges return to mainstream after losses.

Web Summary : Following the death of Maoist leader Hidma, surrendered leader Bhupathi appeals to Maoists to abandon violence and embrace the constitution. He emphasizes that violence yields only loss and advocates for addressing people's issues through constitutional means, urging them to join the mainstream.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली