लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पारडीच्या हनुमाननगरातील दाट वस्तीत एका निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बिबट्या शिरला आणि त्यानंतर चार तासांचा थरार नागपूरकरांनी अनुभवला. बुधवारी सकाळी रच्या सुमारास ही माहिती दिल्यानंतर वन विभागाने दुपारी १:३५ वाजताच्या सुमारास बिबट्यास इंजेक्शनने बेशुद्ध करून पिंजऱ्यातून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला नेले अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हनुमाननगरात अनिल राऊत कुटुंबासह दुमजली इमारतीमधील तळमजल्यावर राहतात. या इमारतीत खासगी रुग्णालय, फार्मसी, पॅथॉलॉजी व लैंड डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे.
कपडे आणायला गेला अन्...
सकाळी ९ वाजता अनिल राऊत यांचा दहावीत शिकत असलेला १५ वर्षांचा मुलगा आलोक आंघोळ केल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असलेल्या खोलीत कपडे आणण्यासाठी गेला. तेथे त्याने दार उघडताच त्याला एक लांब शेपूट दिसली.घाबरलेल्या अवस्थेत त्याने खाली येऊन वडिलांना माहिती दिली. त्याच्या वडिलांनी तातडीने पारडी पोलिस व वन विभागाला याबाबत सूचना दिली. त्यानंतर पोलिस आणि वन विभागाचे पथक तिथे पोहोचले.वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे डॉ. राजेश फुलसुंगे यांनी डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर या बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले.
दरवाजाचा आवाज करताच त्याने हलवली शेपूट
आलोक याने बिबट्याला पाहताच खाली येऊन वडिलांना सांगितले. परंतु, इतक्या दाट वस्तीत बिबट्या कसा येईल, असे म्हणून त्यांनी मुलाकडे दुर्लक्ष केले. परंतु, आलोक पुन्हा दुसऱ्या मजल्यावर गेला. त्याने दरवाजातून झाडू फेकून मारला आणि दरवाजाचा आवाज केला. त्यानंतर बिबट्याने आपली लांब शेपूट हलविली. त्यानंतर आलोक पुन्हा खाली आला. त्याने वडिलांना लांब शेपूट हलत असल्याचे सांगितले. त्यावर अनिल राऊत यांनी वर जाऊन बघितले असता त्यांनाही धक्का बसला. त्यांनी बिबट्या लपून बसल्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये टिपला.
यवतमाळ: कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका
दरम्यान, यवतमाळमध्ये शेतीच्या तार कुंपणात अडकलेल्या नर बिबट्याची वनविभागाच्या पथकाने बुधवारी सुटका करीत त्याला ताब्यात घेतले, पोटावर जखमा झाल्याने त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
Web Summary : A leopard entered a residential area in Nagpur, causing panic. After a four-hour operation, the forest department tranquilized and captured it. In Yavatmal, another leopard was rescued from a fence.
Web Summary : नागपुर में एक तेंदुआ रिहायशी इलाके में घुस गया, जिससे दहशत फैल गई। चार घंटे के ऑपरेशन के बाद वन विभाग ने उसे शांत कर पकड़ लिया। यवतमाल में एक और तेंदुए को बाड़ से बचाया गया।