शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

ठार झाला समजून नागरिकांची गर्दी; 'मेलेला' बिबट्या उठला अन् बघ्यांची बोबडी वळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 07:36 IST

निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता.

लोकमत नेटवर्क

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर निपचित पडलेला बिबट्या ठार झाला असावा असे समजून रस्त्याने येजा करणारी वाहने थांबली. त्यातील काहींनी बिबट्याचा जवळ जात अंदाज घेतला. काहींनी व्हिडीओ शूटिंगही सुरू केले. इतक्यात बिबट्या अचानक उठला आणि साऱ्यांचीच बोबडी वळली. मिळेल तिकडे लोक पळू लागले; मात्र बिबट्याने झुडपातून धूम ठोकली.

निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. तेव्हा काही वाहनधारकांनी गाड्या थांबवून बिबट्या मेला असावा म्हणनू गाड्या थांबवून बिबट्याच्या जवळ जाऊ लागले. एकेक करीत वाहने थांबत राहिली आणि गर्दी वाढत गेली. परिसरातील नागरिकांचीही बिबट्याला पाहण्यासाठी महामार्गावर गर्दी होऊ लागली. काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये बिबट्याचा व्हिडीओ व फोटो चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत गोंधळ सुरू केला. गोंगाट वाढत असतानाच काही वेळापूर्वी निपचित पडलेला बिबट्या अचानक खाडकन उठून उभा राहिला. तेव्हा उपस्थितांची मोठी तारांबळ उडाली. जीव मुठीत घेऊन लोक मिळेल त्या दिशेने पळू लागले. मात्र घाबरलेल्या बिबट्याने जखमी अवस्थेतच रस्त्याच्या कडेला अंधारात धूम ठोकली.

संभाजीनगरमध्ये पंधरा पथके बिबट्याच्या मागावरछत्रपती संभाजीनगर : बिबट्याचे दर्शन होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला असून, तो शहराबाहेर जाण्यासाठी मार्ग शोधत आहे. शनिवारी बिबट्याच्या शोधार्थ सेव्हन हिल ते एमजीएम, परिसर पिंजला आहे.छत्रपती संभाजीनगर वनविभाग, भारतीय सेनेची इकॉलॉजिकल टास्क फोर्स बटालियन आणि नाशिक रेस्क्यू टीमसह ६० पेक्षा अधिक लोकांची पंधरा पथके पाच दिवसांपासून बिबट्याच्या मागावर आहेत.

टॅग्स :leopardबिबट्या