शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कावळा बसायला, फांदी तुटायला; भारती पवारांच्या दौऱ्यावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 11:00 IST

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे दिसल्याने भारती पवार यांनी डॉक्टरांना खडेबोल सुनावले होते. याकडे विरोधकांनी पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचीच एकप्रकारे पोलखोल केल्याची चर्चा सुरु केली होती.

अमरावती/मुंबई: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्या तेथील आरोग्य यंत्रणांचा आढावा घेत आहेत. असे असताना राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यावरून पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे दिसल्याने भारती पवार यांनी डॉक्टरांना खडेबोल सुनावले होते. याकडे विरोधकांनी पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचीच एकप्रकारे पोलखोल केल्याची चर्चा सुरु केली होती. यावर तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. भारती पवार जेव्हा जिल्ह्यात आल्या तेव्हाच नेमका औषधांचा साठा संपत आला असेल. कावळा बसावा आणि फांदी तुटावी अशी परिस्थिती तिथे झाली असावी. यामुळे भारती पवार तिथे बोलल्या असतील, असे तानाजी सावंत म्हणाले. 

यानंतर भारती पवार यांनी कोल्हापूरमध्ये देखील डॉक्टरांना खडेबोल सुनावले. प्रत्येकाला शहरात थांबायचे असेल तर मग ग्रामीण भागात काम कोण करणार असा सवाल विचारत एकदा डॉक्टर झाला की सेवा करायचे विसरून जाता असे खडेबोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुनावले. गरीबांची सेवा करायला म्हणून डॉक्टर होता. परंतू एकदा डॉक्टर झाले की सेवा विसरून जाता. ७० वर्षांपूर्वीचा जमाना गेला आता. जर पुरेसे डॉक्टर नसतील तर रोटेशन लावा. परंतू सर्वांना सेवा मिळाली पाहिजे. मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखायचे असतील तर असा निष्काळजीपणा कसा चालेल अशीही विचारणा त्यांनी केली. 

टॅग्स :Bharati pawarभारती पवारTanaji Sawantतानाजी सावंत