Sanjay Raut Mohsin Naqvi News: पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली. त्यानंतर मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून चषक स्वीकरला नाही. त्यानंतर नकवी निघून गेले. त्यांनी चषकही सोबत नेल्याचा आरोप बीसीसीआयने केलाय. याच सगळ्या वादात आता शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सूर्यकुमार यादव आणि मोहसिन नकवी यांचा हस्तांदोलन करताना दिसत आहेत. त्यावरूनच संजय राऊतांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
राऊत म्हणाले, कॅमेऱ्यासाठी राष्ट्रवादाचे नाटक
नकवी आणि सूर्यकुमार यादव यांचा हस्तांदोलन करतानाच व्हिडीओ शेअर करत खासदार संजय राऊत म्हणाले, "फक्त १५ दिवसांपूर्वी, या मालिकेच्या सुरुवातीला ते (भारतीय संघाचा कर्णधार) पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नक्वी यांच्यासोबत हस्तांदोलन करत होते आणि हसत-हसत फोटो काढत होते. आणि आता? कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू आहे", अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
केंद्र सरकारला उद्देशून संजय राऊत म्हणाले, "जर तुमच्या रक्तात खरंच देशभक्ती असती, तर तुम्ही पाकिस्तानसोबत मैदानात पाऊलही ठेवलं नसतं. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, हे सगळं फक्त नाटक आहे. भारतीय जनतेला मूर्ख बनवलं जात आहे", असे खडेबोल संजय राऊतांनी सुनावले.
मोहसिन नकवींवर बीसीसीआयचे आरोप
पीसीबीबरोबरच आशियाई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या मोहसिन नकवी यांच्यावर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आरोप केले आहे. मोहसिन नकवी हे ट्रॉफी, तसेच टीम इंडियांची पदके घेऊन गेले, असे ते म्हणाले.
आम्ही एसीसीच्या अध्यक्षांकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पण, याचा अर्थ असा होत नाही की, त्यांनी पदकांसोबत ट्रॉफीही घेऊन जावी. हे खूप दुर्दैवी आहे. ट्रॉफी आणि पदके भारताला परत केली जातील, अशी आम्हाला आशा आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत आम्ही याचा निषेध करू", सैकिया म्हणाले.
Web Summary : Sanjay Raut criticizes the government, calling recent events with Pakistan a nationalist charade for cameras. He questioned why India played if patriotism was real, referencing earlier friendly interactions. BCCI accused PCB chief of taking the trophy & medals.
Web Summary : संजय राउत ने सरकार की आलोचना करते हुए पाकिस्तान के साथ हाल की घटनाओं को कैमरे के लिए राष्ट्रवाद का दिखावा बताया। उन्होंने सवाल किया कि अगर देशभक्ति सच्ची थी तो भारत क्यों खेला, पहले के दोस्ताना संबंधों का हवाला दिया। बीसीसीआई ने पीसीबी प्रमुख पर ट्रॉफी और पदक ले जाने का आरोप लगाया।