शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट सीमावादावर सहकार्य करतील, अशी अपेक्षा - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 06:57 IST

अमित शहा यांनी ही बैठक घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन्ही राज्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आलेला असताना बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी अमित शहा यांनी सहा मंत्र्यांची समिती स्थापन केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर दिली. 

बैठकीनंतर अमित शहा म्हणाले की, गृहविभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चांगल्या वातावरणात ही चर्चा झाली. दोन्ही राज्यांच्या वतीने प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा मंत्र्यांमध्ये बैठक होईल. दोन्ही बाजूंकडील कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेतली जावी. प्रवासी, व्यापारी यांना त्रास होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंनी आयपीएस अधिकारी नेमण्याची तयारी दाखविण्यात आली.

सीमावादात केंद्राचा प्रथमच हस्तक्षेप : फडणवीसnअमित शहा यांनी ही बैठक घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन्ही राज्यांचे म्हणणे ऐकून घेतले. nसीमावादात केंद्राने प्रथमच हस्तक्षेप केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीटनंतर सीमा प्रश्न चिघळला होता. यावर बोम्मई यांनी असे स्पष्ट केले की, ते माझे वक्तव्य नव्हते. ते ट्विटर हँडल माझे नाही.

बैठकीत काय ठरले?nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत कोणतेही राज्य एकमेकांच्या भूभागावर दावा सांगणार नाही. nदोन्ही बाजूंचे तीन-तीन याप्रमाणे सहा मंत्री या मुद्द्यावर चर्चा करतील. मोठ्या नेत्यांच्या नावे बनावट ट्विटर खाती तयार करून अफवा पसरविल्या गेल्या. अशा बनावट खात्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. nलोकांचे हित पाहता यावरून राजकारण केले जाऊ नये. 

दोन्ही बाजूंनी बैठकीत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या प्रकरणात सहकार्य करील, अशी अपेक्षा आहे. - अमित शहा, गृहमंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेKarnatakकर्नाटक