शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 4:10 PM

Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. 

मविआसोबत लढण्याची तयारी करता करता वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिले आणि मविआची लढाई आणखी कठीण करून ठेवली. अशातच वंचितच्या काही उमेदवारांचे अर्ज रद्द झाले तर काहींनी माघारी घेतले आहेत. यात आता सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी दोन महत्वाची कारणे देत आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला आहे. 

सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. 

उमेदवारी जाहीर होताच मी गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्हात आलेलो आहे. इथे मी सोलापूरच्या कार्यकारिणीशी भेट झाली. जनतेलाही भेटलो. गेल्या पंधरा दिवसांत मी खूप काही अनुभवले. आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. परंतु इथे मी जे काही अनुभवले ती चळवळ नव्हती, अशी टीका गायकवाड यांनी केली आहे. 

सोलापूरमधील भोळी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे. त्यांच्याबद्दल जनतेत आदर आहे. परंतु चळवळीसाठीची जी फळी लागते तीच इथे पोकळ असल्याचे मला जाणवले आहे. ही फळी पोषक नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

येथील कार्यकारणीचा स्वार्थ आजही तसाच आहे. मता त्यांच्यात बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाही. मी लढण्यासाठी उतरलो होतो, परंतु ती फळी पाहून वाटतेय की मला हातात बंदूक देऊन मैदानात सोडलेय, पण त्या बंदुकीत गोळ्या नसून छर्रे आहेत. या छर्र्यांच्या मदतीने मी युद्ध लढवून जिंकेन असे वाटत नाही, असे राहुल गायकवाड म्हणाले. 

अशा अर्धवट अवस्थेत लढलो तर भाजप कार्यकर्त्यांना मदत करतोय असे वाटतेय. भाजपाच्या उमेदवाराला मदत करतोय अशी भीती आहे. त्यांचा एक नेता संसदेत जाईल आणि संविधानाला धोका निर्माण होईल, असे काही घडू नये म्हणून उमेदवारी मागे घेत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मी जर अर्धवट लढलो तर भाजपच्या कार्यकर्त्याला मदत करतोय, असं वाटतंय. भाजपच्या उमेदवाराला सोईचं वातावरण निर्माण होईल का, अशी मला भीती वाटत आहे. भाजपचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल. संविधानाला धोका निर्माण होईल, असं माझ्याकडून काही होऊ नये असे मला वाटतं, असं थेट स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी दिलं.

टॅग्स :solapur-pcसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४