महाराष्ट्रातल्या ९८ उमेदवारांनी मारली UPSC मध्ये बाजी
By Admin | Updated: July 4, 2015 15:25 IST2015-07-04T15:25:57+5:302015-07-04T15:25:57+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातल्या ९८ जणांनी बाजी मारली असून ९८व्या स्थानावर आलेल्या अबोली नरवणेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे

महाराष्ट्रातल्या ९८ उमेदवारांनी मारली UPSC मध्ये बाजी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातल्या ९८ जणांनी बाजी मारली असून ९८व्या स्थानावर आलेल्या अबोली नरवणेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रंचड मेहनतीबरोबरच नृत्याची आवड जोपासणा-या अबोली नरवणेने रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे.
तर चार चार वर्ष कठोर मेहनत घेतल्यावर यश मिळाल्यावर केलेल्या श्रमांचं सार्थक झाल्याची प्रतिक्रिया एका यशस्वी उमेदवाराने व्यक्त केली.
भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा तसेच भारतीय महसूल विभागासारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार काम करतात आणि भारत सरकारसाठी अत्यंत मोलाची भूमिका निभावतात. अशा परीक्षेमध्ये देशभरातून पहिल्या पाच स्थानांपैकी पहिल्या चार स्थानांवर मुलींनी यशाची मोहर उमटवली आहे. UPSC २०१४ च्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक ईरा सिंघलने पटकावला आहे, तर रेणू राज, निधी गुप्ता व वंदना राव या अनुक्रमे दुस-या, तिस-या व चौथ्या स्थानावर आहेत.