शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मथुरा येथे अडकून पडलेले 95 वारकरी महाराष्ट्रात सुखरूप परतले; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 22:01 IST

परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन  हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार  नियोजन करण्यात आले. 

मुंबई : कोरोनामुळे देशातील तसेच राज्यातील नागरिक विविध ठिकाणी अडकून बसले आहेत. असेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे नागरिक मथुरा येथे अडकल्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना २७ मार्च, २०२० रोजी दूरध्वनीद्वारे हभप वास्कर महाराज व उखळीकर महाराज पंढरपूर यांनी कल्पना दिली. यांसदर्भात उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ उपसभापती कार्यालयीन खाजगी सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी यांना अडकलेल्या वारकऱ्यांना सोडविण्याबाबत उपयोजन करण्यास आदेश दिले. त्यानुसार या अधिकारी यांनी २७ पासून उत्तर प्रदेश गृहविभाग, जिल्हाधिकारी मथुरा, तसेच मध्य प्रदेश गृहविभाग यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन  हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार  नियोजन करण्यात आले. या वारकऱ्यांना प्रवास करण्यासाठी कोणाकडे संपर्क साधायचा याबाबत काहीच ज्ञान नव्हते, वृदांवन मथुरा येथून निघण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, रस्त्यात रहाण्याची व्यवस्था नव्हती तसेच  विविध राज्याच्या प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य नसल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते. परंतु डॉ. नीलम गोऱ्हे  उपसभापती यांनी त्यांना धीर दिला आणि प्रशासनांशी संवाद साधून त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व सातत्याने तसे काम केले. उपसभापती कार्यालयाच्या पाठपुराव्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना मदत मिळण्यास सुरवात झाली आणि त्यांना मायेची साथ मिळाल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले. या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवाससाठी दोन ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली तर यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काल  २९ मार्च, २०२० रोजी त्यांचे वृन्दावन येथे  हेल्थ चेकअप करून त्यांना उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात आणण्याबाबतच्या प्रवासाची परवानगी मिळाली.यात उपसभापती कार्यालयातील अधिकारी सचिन चिखलीकर हे वारकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांना मायनगरीत आणण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. आज  ३० मार्च, २०२० रोजी पहाटे त्यांचे परळी वैजनाथ येथे आगमन झाले असून त्यांचे तेथे पुन्हा मेडिकल चेकअप केले जात असून त्यांना मेडिकल अधिकारी यांच्या निगरानी ठेवण्यात आले असून लवकरच त्यांचे पंढरपूर येथे आगमन होईल. या संपूर्ण संवेदनशील वातावरणात डॉ. नीलम गोऱ्हेंनी वारकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना महाराष्ट्र मध्ये आणण्यात केलेल्या प्रयत्नाबद्दल वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या