लाचखोर आयुक्ताकडे मिळाली 92 लाखांची रोकड

By Admin | Updated: July 20, 2014 01:44 IST2014-07-20T01:44:04+5:302014-07-20T01:44:04+5:30

निवासस्थानाहून एसीबीच्या पथकाने 92.75 लाख रूपयांची रोकड जप्त केली. या कारवाईदरम्यान एसीबी पथकाने 4 ते 5 चारचाकी वाहन तसेच काही दुचाकीदेखील जप्त केल्या आहेत.

92 lakh cash received from the bribe commissioner | लाचखोर आयुक्ताकडे मिळाली 92 लाखांची रोकड

लाचखोर आयुक्ताकडे मिळाली 92 लाखांची रोकड

अमरावती : 25 हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेले अपर आदिवासी आयुक्त भास्कर वाळिंबे यांच्या अमरावती आणि ठाणो येथील निवासस्थानांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) धाडी घातल्या. त्यांच्या निवासस्थानाहून एसीबीच्या पथकाने 92.75 लाख रूपयांची रोकड जप्त केली. या कारवाईदरम्यान एसीबी पथकाने 4 ते 5 चारचाकी वाहन तसेच काही दुचाकीदेखील जप्त केल्या आहेत.
यवतमाळ जिलतील दिग्रस येथील नारायण म्हात्रे या इमारत मालकाला इमारतीचे थकीत देयक काढून देण्याकरिता वाळिंबे यांनी कनिष्ठ लिपिकामार्फत 25 हजारांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने वाळिंबे यांना पकडले होते. शनिवारी पथकाने त्यांच्या अमरावती शहरातील विसावा कॉलनीतील घराची झडती घेऊन रोख 21 लाख 75 हजार रूपये जप्त केले. याचवेळी एसीबीच्या दुस:या पथकाने वाळिंबे यांच्या ठाणो येथील दुस:या फ्लॅटचीही झडती घेतली. तेथून 71 लाखांची रोकड जप्त केली. अपर आदिवासी आयुक्त वाळिंबे यांच्या घरांवर टाकलेल्या धाडी दरम्यान 4 ते 5 चारचाकी वाहन आणि इतक्याच इंपोर्टेड दुचाकीसुध्दा जप्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: 92 lakh cash received from the bribe commissioner