शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:34 IST

Uddhav Thackeray News: कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करू नका. त्यांनी नोटबंदी केली, तुम्ही व्होटबंदी करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केले.

Uddhav Thackeray News: कर्जमाफ करतो म्हणून सरकराने सांगितली, पण कर्जमाफी दिली नाही. काय करावे आणि काय नाही, अशी आमची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना काही देत नाहीत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देत आहात. दिवाळीच्या आधी आम्हाला मदत देतो, असे सांगितले होते. परंतु, अद्यापही मदत दिलेली नाही. तुमच्या तुटक्या-फुटक्या पैशांनी आमची कामे होत नाहीत. पेरणीची वेळ निघून गेली, आम्ही आता काय करायचे, अशी व्यथा एका ९० वर्षीय शेतकऱ्याने उद्धव ठाकरेंसमोर मांडली. उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

तुम्ही सर्व शेतकरी आहात ना? माझ्यासारखे शहरीबाबू नाहीत ना? मी खरे सांगतो की, मला शेतीमधील काहीच कळत नाही. आता  कर्जमुक्ती केली नाही तर मग कधी करणार? जमीन खरडून गेली आहे, तरीही इकडे कोणी यायला तयार नाही. पूर्ण माती वाहून गेली. सर्व बोगस कार्यभार आहे. मतचोरीशिवाय सरकारला दुसरा कोणताच पर्याय नाही. वेळ आली तर धोंडे मारा, असे मी असे म्हणणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करू नका

केंद्रीय पथक तुमच्या दारात आले की, नाही? परदेशी समिती आली की नाही? मग जुलैपासून परदेशी झोपले का? केंद्रीय पथक आता येऊन गेले. केंद्रीय समिती तुमच्याकडे येणार नाही. पंतप्रधान मोदी हे बिहारमध्ये निवडणुका असल्यामुळे न मागता महिलांच्या खात्यावर दहा-दहा हजार रुपये टाकत आहेत. मराठवाड्यातला शेतकरी मेटाकोटीला आले असताना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याकडे फिरकलेच नाहीत. प्रचार करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. या सरकारला जागा दाखवली पाहिजे, जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करू नका. नोटबंदी केली, तशी व्होटबंदी करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान,  शेतकऱ्यांनी मदत मागितली. कर्जमाफी मागितली की, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, सरकारने किती वेळा कर्जमाफी करायची. कुठेतरी शेतकऱ्यांनी आपले हातपाय हलवले पाहिजेत. तुम्ही आणि तुमच्या मुलाने असे काय कोट्यावधी रुपयाची पुण्यामध्ये जमीन लाटण्याचे काम तुम्ही केले आहे. एकीकडे मराठवाड्यातला शेतकरी मदत मागतोय पण त्याला मदत दिली जात नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tears as 90-Year-Old Farmer Pleads for Loan Waiver to Thackeray.

Web Summary : During Uddhav Thackeray's Marathwada tour, a 90-year-old farmer lamented unfulfilled loan waiver promises. Thackeray criticized the government's neglect of farmers, urging them to demand action and not vote for BJP until the waivers are granted.
टॅग्स :FarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना