शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणानंतरही 90% तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 19:44 IST

आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांचं मत

नागपूर: सध्या सर्व जाती-धर्माच्या लोकांकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. मात्र सर्वांना आरक्षण दिल्यावरही 90 टक्के तरुण सरकारीनोकरीपासून वंचित राहतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनात रामदास फुटाणेंनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्यात फडणवीस यांनी आरक्षण आणि सरकारी नोकऱ्या यांच्या संदर्भातलं परखड मत मांडलं. सर्व जातीच्या व्यक्ती सध्या आरक्षण मागत आहेत. मात्र या सर्वांना आरक्षण देऊनही त्यातील 90 टक्के तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. सरकारी नोकरीबद्दल तरुणांच्या मनात आकर्षण आहे. मात्र सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे, ही बाब तरुणांनी समजून घ्यायला हवी. हळूहळू ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येईल, असं फडणवीस यांनी म्हटलं. सर्वांना आरक्षण मिळालं, तरी सरकारी नोकऱ्या मिळतीलच असं नाही. ही गोष्ट कोणीतरी परखडपणे सांगण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीवरुन सांगितलं. राज्य सरकारमध्ये दरवर्षी साधारणत: 25 हजार पदांसाठी भरती होते. मात्र आपल्याकडे एकाच तालुक्यातले 25 हजार तरुण सरकारी नोकरीसाठी आस लावून बसलेले असतात. उपलब्ध होणाऱ्या सरकारी नोकऱ्या आणि त्यासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांची संख्या यांचं प्रमाण कधीही जुळणार नाही. त्यामुळे आरक्षण मिळालं की सरकारी नोकरीदेखील मिळेल, असं होण्याची शक्यता अतिशय कमी आहे, असं वास्तववादी मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसreservationआरक्षणGovernmentसरकारjobनोकरी