दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय करणार ९० लाखांची मदत
By Admin | Updated: September 15, 2015 15:09 IST2015-09-15T14:13:50+5:302015-09-15T15:09:59+5:30
बॉलिवूड स्टार अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला असून तो ९० लाखांची मदत करणार आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय करणार ९० लाखांची मदत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूीवर नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेसारखे सेलिब्रिटी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले असतानाच आता बॉलिवूड स्टार अक्षय कुमारही मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करणार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी अक्षयकडून ९० लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे वृत्त असून येत्या सहा महिन्यात हे पैसे देण्यात येतील असे समजते.
अक्षयच्या मदतीच्या घोषणेच्या एक दिवस आधीच क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अजिंक्यने चेक सुपूर्त केला होता. 'माझी आजी ९० वर्षांची आहे, आजही ती शेती करते आणि ज्यावेळी महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळामुळे होरपळत आहे त्यावेळी मीही काही ना काही मदत करायला हवी असं वाटतं', असे अजिंक्यने यावेळी म्हटले.
अजिंक्यच्या पाठोपाठ खिलाडीकुमार अक्षनेही मदतीचा हात पुढे केला असून इतर सेलिब्रिटीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मदत करतील अशी आशा आहे.