९० दिवसांत धनगर बांधवांना दाखले!
By Admin | Updated: August 24, 2016 04:02 IST2016-08-24T04:02:34+5:302016-08-24T04:02:34+5:30
बांधवांना ९० दिवसांत एसटी प्रवर्गाचे दाखले मिळवून देण्याचा दावा राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला

९० दिवसांत धनगर बांधवांना दाखले!
मुंबई : धनगर समाजातील बांधवांना ९० दिवसांत एसटी प्रवर्गाचे दाखले मिळवून देण्याचा दावा राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. त्यासाठी धनगर बांधवांनी एसटी जातीचा दाखला मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांत केलेल्या अर्जांची एक प्रत समितीला पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पाटील म्हणाले की, सर्व जिल्ह्यांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयांत व तालुका तहसीलदार कार्यालयांमध्ये धनगर बांधव अर्ज करीत आहेत. मात्र धनगर बांधवांना ९० दिवसांत एसटी प्रवर्गाचे दाखले देण्याची शक्कल समितीकडे आहे. शिवाय धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक पुरावे समितीकडे आहेत. मात्र बहुतांश बांधवांनी अर्ज केले नसल्याने त्यांना दाखले देता येणार नाहीत.
त्यामुळे यापुढे जे अर्ज केले जातील, त्याची एक प्रत समितीला पाठविण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)