नांदेडजवळ व-हाडाच्या बसला अपघात होऊन ९ ठार
By Admin | Updated: June 6, 2015 13:01 IST2015-06-06T09:08:43+5:302015-06-06T13:01:08+5:30
नांदेड विद्यापीठाजवळ शुक्रवारी मध्यरात्री व-हाडाच्या बसला झालेल्या अपघातात ९ जण ठार तर काही जण जखमी झाले आहेत.

नांदेडजवळ व-हाडाच्या बसला अपघात होऊन ९ ठार
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. ६ - नांदेड विद्यापीठाजवळ शुक्रवारी मध्यरात्री व-हाडाच्या बसला झालेल्या अपघातात ९ जण ठार तर काही जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणा-या ट्रकने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील प्रवासी नांदेड येथील बरड गावचे रहिवासी होते. कर्नाटकमधील गुलबर्गा येथील लग्नसमारंभासाठी व-हाडाच्या दोन बस जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने एका बसला धडक दिली. ती एवढी भीषण होती की बसचे छत उडून गेले आणि बसचा चक्काचूरही झाला.
रात्रीच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने जखमींना मदत मिळण्यासही उशीर झाला.