कराडजवळ भीषण अपघातात ९ ठार

By Admin | Updated: June 13, 2014 14:19 IST2014-06-13T14:19:16+5:302014-06-13T14:19:54+5:30

कराडजवळ शुक्रवारी सकाळी ट्रक-जीपच्या भीषण अपघातात ९ जण ठार झाले आहेत.

9 dead in a road accident near Karad | कराडजवळ भीषण अपघातात ९ ठार

कराडजवळ भीषण अपघातात ९ ठार

 ऑनलाइन टीम

सातारा, दि. १३ - देवदर्शनाहून परत येणा-या भाविकांवर कराडजवळ काळाने झडप घातली. कराडजवळ शुक्रवारी सकाळी ट्रक-जीपच्या भीषण अपघातात ९ जण ठार झाले आहेत. मृत नागरिक पुण्याचे रहिवासी असून कोल्हापूरहून ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाल्याचे समजते. 
पुणे- बंगळुरू महामार्गावर कराडजवळील पेरले गावाजवळ शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास एका जीपने ट्रकला जोरदार धडक दिली.  हा अपघात एवढा भीषण होता की जीपमधील ९ प्रवासी जागीच ठार झाले.  जीपमध्ये पुणे, शिक्रापूरमधील एकूण २२ प्रवासी होते. 
 

Web Title: 9 dead in a road accident near Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.