आपत्कालीन सेवेसाठी धावतात ९३७ रुग्णवाहीका

By Admin | Updated: September 17, 2014 01:35 IST2014-09-17T00:58:13+5:302014-09-17T01:35:07+5:30

राज्यात ७३ हजार नागरिकांना मिळाला लाभ

9 37 ambulances run for emergency services | आपत्कालीन सेवेसाठी धावतात ९३७ रुग्णवाहीका

आपत्कालीन सेवेसाठी धावतात ९३७ रुग्णवाहीका

बुलडाणा : रस्ते अपघात, आग, पुरसदृश्य परिस्थती, दंगल, सर्पदंश, प्रसुती आदी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मोफत वैद्यकीय सेवा देण्याची योजना राबविली जात आहे. ही सेवा पुरविण्यासाठी राज्यात ९३७ रुग्णवाहीका धावत असून, आजवर ७३ हजार नागरिकांना या योजनेतून आपत्कालीन सेवा पुरविण्यात आली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत भारत विकास समूह कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाने नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून टप्प्याट प्प्याने ९३७ रुग्णवाहिका तैनात केल्या. आपदग्रस्तांना व रुग्णांना पहिल्या अध्र्या तासाच्या आत उ पचार मिळावा, यासाठी १0८ या टोल फ्री क्रमांकाहून अद्ययावत वैद्यकीय सुविधेसह मोफत रुग्णवाहिका देण्यात येते. शहरी भागासाठी तीन आणि ग्रामीण भागासाठी एक रुग्णवाहिका अशी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रुग्णवाहिकेत आठ तासासाठी एक याप्रमाणे डॉक्टर कार्यरत आहेत. एका रुग्णवाहिकेसाठी दोन चालक देण्यात आले असून, डॉक्टर आणि चालकांनाही आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षित मनुष्यबळ रूग्णांच्या सुश्रुषेसाठी २४ तास तैनात आहेत.

** ७३ हजार नागरिकांना मिळाली सेवा
या रुग्णवाहीकांमधून गत आठ महिन्यात राज्यातील ११ हजार २५१ रस्ते अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हृदयरोगाचा त्रास जाणवलेल्या ८३६, गुंतागुंतीची प्रसुतिच्या अनुषंगाने १९ हजार ७0१ भगिनी, वैद्यकीय आपत्कालीन सेवेचा २५ हजार ६८७ तर अन्य सेवेचा १५ हजार ७१६ जणांना सेवेचा फायदा झाला आहे.

Web Title: 9 37 ambulances run for emergency services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.