९00 भाविकांचे पंढरपूरकडे प्रस्थान
By Admin | Updated: July 3, 2014 22:55 IST2014-07-03T21:17:04+5:302014-07-03T22:55:50+5:30
खामगाव-पंढरपूर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी सुमारे ९00 भाविक प्रवाश्यांना घेऊन दुपारी ४.३0 वाजता पंढरपूरकडे रवाना झाली.

९00 भाविकांचे पंढरपूरकडे प्रस्थान
खामगाव : रेल्वे स्थानक येथून आज खामगाव-पंढरपूर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी सुमारे ९00 भाविक प्रवाश्यांना घेऊन दुपारी ४.३0 वाजता पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी एक्सप्रेसला झेंडी दाखविली.
सलग १२ व्या वर्षी येथून आषाढ वारीला रेल्वेने जाण्यासाठी आज सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. तर तिकिट काढण्यासाठी सुध्दा दुपारपर्यंत रांग लागली होती. यावर्षी येथून ६ जनरल व १ आरक्षित व एक एसएलआर अशा ८ बोग्या होत्या. यामधून ५८५ तिकीट विक्री होवून सुमारे ९00 भाविक पंढरपूरला रवाना झाले. तर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची दुसरी फेरी उद्या ४ जुलै नंतर तिसरी ६ व चौथी ७ जुलै रोजी येथून रवाना होणार आहे. या एक्सप्रेसला अमरावती येथून आलेल्या ८ बोग्या जलंब स्टेशनवर जोडल्यानंतर ही १६ बोग्यांची एक्सप्रेस जलंब येथून निघणार आहे. आज खामगाव येथून पहिल्या फेरीपासून रेल्वेला सुमारे १ लाख २५ हजाराचे उत्पन्न येथील स्थानकावरुन मिळाले. यासाठी रेल्वे स्थानक प्रबंधक सुभाष वरुडकर, संजय भगत, अजय गोहे, यामीन, चेतन फडणीस, सोनाजी तेलगोटे, इंदिराबाई ठाकूर, उमाबाई ढोरे, संजीवनीबाई इंगळे, स्नेहल सोनोने, प्रशांत हिंगे आदींनी प्रयत्न केले. सदर एक्सप्रेस रवाना होण्यापूर्वी आ.दिलीपकुमार सानंदा, जि.प. अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे व न.प. काँग्रेस पक्षनेता अशोककुमार सानंदा यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे तसेच एक्सप्रेसचे पूजन केले. एक्सप्रेसचालक ए.के.गोहरे व गार्ड एम.बी.परदेशी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आ.सानंदा यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही एक्सप्रेस रवाना झाली. यावेळी न.प.उपाध्यक्ष संतोष देशमुख, जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य सुरेश वनारे, सौ.सरस्वती खाचणे यांची उपस्थिती होती. यावेळी हरिओम ग्रुपकडून भाविकांना फराळी चिवडा वितरण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंजाजी टिकार व इतरांनी औषधीचे वाटप केले.