864 अवैध दारूच्या बाटल्या जप्त

By Admin | Updated: July 22, 2014 01:46 IST2014-07-22T01:46:59+5:302014-07-22T01:46:59+5:30

कोकण रेल्वेमार्गे अवैध दारूची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असून, त्याची डोकेदुखी रेल्वे पोलिसांना ठरत आहे.

864 illegal liquor bottles seized | 864 अवैध दारूच्या बाटल्या जप्त

864 अवैध दारूच्या बाटल्या जप्त

मुंबई : कोकण रेल्वेमार्गे अवैध दारूची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असून, त्याची डोकेदुखी रेल्वे पोलिसांना ठरत आहे. त्यामुळे अशा वाहतुकीवर रेल्वे पोलिसांकडून आता कठोर कारवाई केली जात आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून काही दिवसांपूर्वी 864 दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते. 
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतून दारूची अवैधरीत्या वाहतूक करणो हा गुन्हा असतानाही अनेक जण ही वाहतूक करतात. कोकण रेल्वेच्या ट्रेनमधून  दारूची अवैधपणो वाहतूक वाढल्याने रेल्वे पोलिसांनी अशा वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेत जानेवारीच्या पहिल्या तीन महिन्यांत कारवाई केली आहे. तब्बल 1 लाख 8 हजार 207 रुपये किमतीच्या 3 हजार 570 दारूच्या बाटल्या या महिन्यात हस्तगत केल्या. 12619 मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून  दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलीस दलाचे कॉन्स्टेबल मारुती आणि प्रवीण के., तसेच स्थानिक पोलिसांनी कारवार स्थानकात जनरल डब्यात तपासणी केली. तपासणीनंतर 18 खोक्यांतून 864 दारूच्या बाटल्या आढळल्या. हा माल भटकळ स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रवाशांकडे विचारणा केली तेव्हा दारूबाबत कुठल्याही प्रवाशाने माहिती दिली नाही. तसेच संशयित व्यक्तीही सापडल्या नसल्याचे कोकण रेल्वे पोलीस (आरपीएफ) महानिरीक्षक व मुख्य सुरक्षा आयुक्त (कोकण रेल्वे) ए.एन. सिन्हा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: 864 illegal liquor bottles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.