पन्हळघर निवडणुकीसाठी ८५ टक्के मतदान

By Admin | Updated: August 25, 2016 02:52 IST2016-08-25T02:52:22+5:302016-08-25T02:52:22+5:30

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे ८५ टक्के, तर मेढा, साजगाव, पोशिर, शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज

85 percent polling for Pahalghar elections | पन्हळघर निवडणुकीसाठी ८५ टक्के मतदान

पन्हळघर निवडणुकीसाठी ८५ टक्के मतदान

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे ८५ टक्के, तर मेढा, साजगाव, पोशिर, शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतमोजणी २६ आॅगस्टला, तर निवडणुकीचा निकाल हा २९ आॅगस्ट रोजी लागणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यातील आठ विविध मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही मिळून १२ जागांसाठी २४ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रात बंद झाले. मतदानासाठी सकाळी मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास मतदार कमी संख्येने बाहेर पडले. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पन्हळघर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान झाले होते, तर पोटनिवडणुकीसाठी ६१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी उपलब्ध झाली नव्हती. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीमधील सात जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते.
जिल्ह्यातील विविध ८१ ग्रामपंचायतीमधील १३२ जागांसाठी पोटनिवडणूक होणार होती.(प्रतिनिधी)
वडखळ : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाशी येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील एका रिक्त झालेल्या जागेसाठी बुधवारी निवडणूक शांततेने पार पडली. ५९ टक्के मतदान झाल्याची नोंद निवडणूक अधिकारी पी.आर.पाटील यांनी दिली. दोन उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतमोजणी २६ आॅगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीत राजेंद्र थवई व सतीश म्हात्रे रिंगणात उभे होते. वॉर्ड क्र. ३ मधील एकूण १०४७ मतदारांपैकी ६१७ मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त होता.

Web Title: 85 percent polling for Pahalghar elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.