राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या विकासाचे ध्येय!
By Admin | Updated: August 22, 2014 01:18 IST2014-08-22T01:18:20+5:302014-08-22T01:18:20+5:30
आमचे सरकार पुढील पाच वर्षात राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली़
राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या विकासाचे ध्येय!
नांदेड : दुष्काळ, गारपीट, टंचाईच्या नैसर्गिक संकटात बळीराजाला साथ देत राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च केल़े परंतु केवळ तात्कालिक उपाययोजना करून भागणार नाही, त्यामुळे येणारे आमचे सरकार पुढील पाच वर्षात राज्यातील 82 टक्के कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली़
नांदेड-विष्णुपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अद्ययावत वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होत़े व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी़पी़ सावंत आदी उपस्थित होत़े
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात केवळ 18 टक्के जमीन सिंचनाखाली आह़े त्यामुळे नैसर्गिक आपत्तीकाळात 82 टक्के कोरडवाहू जमिनीवर अवलंबून असलेला शेतकरी संकटात सापडतो़ दुष्काळावर भाष्य करीत ते म्हणाले, 5क् टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या राज्यातील 138 तालुक्यांना विशेष सवलती दिल्या आहेत़ मराठवाडय़ातील सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन आणखी काही तालुके यादीत समाविष्ट केले जातील़ पूर्वी सवलती देताना जिल्हा घटक होता, आता तो तालुका ठेवल्याने टंचाईग्रस्तांचा अधिकाधिक समावेश होऊ शकणार आह़े
च्मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात केवळ 18 टक्के जमीन सिंचनाखाली आह़े त्यामुळे नैसर्गिक आपत्तीकाळात 82 टक्के कोरडवाहू जमिनीवर अवलंबून असलेला शेतकरी संकटात सापडतो़ त्यांना सरकार मदतही करत़े परंतु, या कोरडवाहू शेतीचा शाश्वत विकास हेच यापुढचे ध्येय असेल़