८२ लाखांचा अपहार; माजी सरपंचावर गुन्हा
By Admin | Updated: April 6, 2015 03:13 IST2015-04-06T03:13:19+5:302015-04-06T03:13:19+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच व दोन ग्रामसेवकांवर मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

८२ लाखांचा अपहार; माजी सरपंचावर गुन्हा
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच व दोन ग्रामसेवकांवर मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘लोकमत’ने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले. भांग्रापाणी ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या विविध कामांमध्ये अपहार झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. अहवालात अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश अक्कलकुवा गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु आदेशाचे पालन होत नसल्याचे ‘लोकमत’ने उघड केले होते. अखेर अक्कलकुवा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी भरत फकिरा निकुंभे यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला. भांग्रापाणीच्या तत्कालीन सरपंच वत्सलाबाई बहादुरसिंग वसावे, तत्कालीन ग्रामसेवक भुपेंद्र रामदास माळी (हल्ली नेमणूक पंचायत समिती, अक्कलकुवा) व योगेंद्र भटू सोनवणे यांनी ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीतून अपहार केला. (प्रतिनिधी)