शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

लेदर कारखान्यांचे ८० टक्के सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:21 IST

धारावी पुनर्विकास प्रकल्प: जमीनमालक अनुत्सुक; पुन्हा सहभागी होण्यासाठी संधीची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: चर्मोद्योगाशी संबंधित सुमारे पाच ते सहा हजार उद्योग प्रकल्प धारावीमध्ये असून, त्यात टॅनिंग, कारखाने, कार्यशाळा आणि किरकोळ विक्रीचा समावेश आहे. यातील सुमारे ८० टक्के युनिट्स (लेदरचे कारखाने) चे सर्वेक्षण धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पूर्ण झाले आहे. मात्र, काही कारखाने आणि कार्यशाळा खासगी जमिनींवर असल्यामुळे जमीनमालकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे  त्यांचे सर्वेक्षण बाकी आहे.  मात्र, तरीही सरकारने आमचे म्हणणे ऐकावे आणि पुन्हा सर्वेक्षणात सहभागी होण्याची संधी द्यावी, असा सूर व्यावसायिकांनी लावला आहे.

चर्मोद्योग ‘प्रदूषणकारक’ वर्गात मोडतो. चामडे प्रक्रिया कारखान्यांमुळे (टॅनरीज) ही चिंता अधिक आहे. मात्र काळा किल्ला रोड येथील आलिम यांनी सांगितले की, धारावीमध्ये ९५ टक्के टॅनरीज बंद झाल्या आहेत. उरलेल्या पाच टक्के टॅनरीजसाठीही तोडगा निघू शकतो. आमच्या गोदामांमध्येही रसायन वापरले जात नाही. 

‘आमच्याशी संवाद साधा’व्यावसायिक नरेंद्र यांनी सांगितले की, आमच्या भागात किमान १० कारखाने आहेत. मी एकटा २० कारखान्यांकडून साहित्य खरेदी करतो. सरकारने आमच्याशी संवाद साधावा. आम्ही मिळून यावर तोडगा काढू.

व्यवसायात मंदीसूरज गुप्ता म्हणाले की, पुनर्विकासामुळे संधी मिळतील. मात्र, सध्या बाजार मंदावलेला आहे. पूर्वी कामगारांचे पगार भरल्यानंतर निव्वळ कमाई ३० हजार रुपये महिन्याला होती. आता सर्व ऑनलाइन विकले जात असल्यामुळे अडचणीत सापडलो आहोत. 

समावेशक विकास आणि दीर्घकालीन शाश्वततेवर आमचा भर आहे. पाच वर्षांसाठी ‘एसजीएसटी’ परतावा देतानाच आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम टाऊनशिप  उभारत आहोत. ते स्थानिक उद्योगांना वाढवण्यास मदत करतील, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले.

धारावीतच व्यवसायासाठी जागा देण्यात आली तरी ती मॉलमध्ये असेल का? सरकार किंवा ‘डीआरपी’ने या बाबतीत उत्तर दिल्यास दिलासा मिळेल. मुंबईतील अनेक मॉल्स फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. पुनर्विकासाला विरोध नाही. तो आवश्यक आहे. पण त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल, असे दीपक काळे म्हणाले.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र