‘त्याच्या’ झोपडीत ८० पदकांची रेलचेल

By Admin | Updated: November 18, 2014 02:23 IST2014-11-18T02:23:15+5:302014-11-18T02:23:15+5:30

घरात अठराविश्व दारिद्र्य, वडील आजारी असल्याने अंथरुणाला खिळून, आई रोजंदारीवर कामाला जाऊन संसाराचा गाडा ओढते,

80 gallons of relief in his 'hut' | ‘त्याच्या’ झोपडीत ८० पदकांची रेलचेल

‘त्याच्या’ झोपडीत ८० पदकांची रेलचेल

भाऊसाहेब येवले, राहुरी
घरात अठराविश्व दारिद्र्य, वडील आजारी असल्याने अंथरुणाला खिळून, आई रोजंदारीवर कामाला जाऊन संसाराचा गाडा ओढते, अशाही परिस्थितीत राहुरी येथील झोपडीत राहणाऱ्या सखाराम बर्डे या युवकाने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिल्हा व राज्य पातळीवर तब्बल ८० पदकांची कमाई केली आहे.
आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे, परंतु त्यासाठी एखाद्या प्रायोजकाच्या मदतीची गरज आहे.
सखारामचे वडील शांताराम यांना दम्याचा विकार असल्याने ते घरी असतात़ आई १२० रुपये रोजंदारीवर काम करते. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर अरनॉल्ड श्वेइनेगर यांचा फोटो पाहून सखारामने जागतिक पातळीवर करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले़ वयाच्या १५व्या वर्षी सखारामने पहिले पदक कमावले, तेव्हाच त्याची क्षमता सिद्ध झाली होती.
आर्थिक अडचणींमुळे बारावीनंतर सखारामला शिक्षण अर्धवट सोडावे लागले़ राज्यस्तरीय मोरेश्वर श्री, छत्रपती चषक, महापौर चषक, नगरश्री अशा स्पर्धा त्याने जिंकल्या.
कधी पेरू-आंबे उतरविणे, कधी मोलमजुरी करून तो कुटुंबाला हातभार लावतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्यास पुणे अथवा मुंबई येथे सरावाची गरज आहे. तसेच दररोजच्या खुराकाचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने सखारामच्या यशावर मर्यादा येत आहेत. रेशन कार्डवर मिळणाऱ्या तीन रुपये किलो तांदळावर त्याचे कुटुंब उपजीविका करते़
आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखविण्यासाठी सखारामने अनेक नेते व अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले़ मात्र आश्वासनाशिवाय त्याच्या पदरात काहीही पडले नाही़
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे, परंतु त्यासाठी एखाद्या प्रायोजकाच्या मदतीची त्याला गरज आहे.

Web Title: 80 gallons of relief in his 'hut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.