आठवर्षीय बहिणीवर भावांकडून बलात्कार

By Admin | Updated: September 17, 2014 02:33 IST2014-09-17T02:33:57+5:302014-09-17T02:33:57+5:30

तांबापुरा भागातील एका आठवर्षीय बालिकेवर तिचा सख्खा भाऊ व चुलत आतेभावानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

8 year old sister raped by brother | आठवर्षीय बहिणीवर भावांकडून बलात्कार

आठवर्षीय बहिणीवर भावांकडून बलात्कार

गुन्हा दाखल : चॉकलेट व चप्पल घेऊन देण्याचे आमिष दाखविले
जळगाव : तांबापुरा भागातील एका आठवर्षीय बालिकेवर तिचा सख्खा भाऊ व चुलत आतेभावानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येथील औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही फरारी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 
पीडित आठवर्षीय बालिकेला चॉकलेट व चप्पल घेऊन देण्याचे आमिष दाखवून 15 दिवसांपूर्वी आतेभावाच्या घरी तसेच शिरसोली नाक्याजवळील पारख संकुल परिसरात नेऊन या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. संबंधित बाब पीडित बालिकेने तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर तिच्या वडिलांनी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी बालिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली आहे. 
या प्रकरणी दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.  (प्रतिनिधी) 
 
गुन्हेगारी पाश्र्वभूमी अन् बिकट परिस्थिती..
च्सख्ख्या बहिणीवर अत्याचार करणारा तिचा नराधम भाऊ 16 वर्षाचा आहे. तर दुसरा आरोपी व पीडित बालिकेचा चुलत आतेभाऊ 18 वर्षाचा आहे. दोघांना दारू आणि गांजा पिण्याचे व्यसन आहे. शहरातील एका पाइप चोरीच्या गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 
च्पीडित बालिकेच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. ती तिसरीत शिक्षण घेत आहे. तिच्या मोठय़ा बहिणीला सासरच्या मंडळींनी जाळून मारले. त्यानंतर तिच्या आईचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. 

 

Web Title: 8 year old sister raped by brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.