८ वर्षांच्या मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार

By Admin | Updated: October 20, 2016 12:02 IST2016-10-20T12:02:52+5:302016-10-20T12:02:52+5:30

- एका २३ वर्षीय तरूणाने ८ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना टिटवाळ्याजवळ घडली

An 8-year-old child is unnatural atrocious | ८ वर्षांच्या मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार

८ वर्षांच्या मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार

>ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. २० - एका २३ वर्षीय तरूणाने ८ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना टिटवाळ्याजवळ घडली आहे. 
कल्याण तालुका पोलीस ठाणे, टिटवाळा येथून जवळच असणाऱ्या कोंढेरी गावात ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. येथील दिपराज उर्फ बंटी दिवाकर तेरसे(23) याने येथीलच आठ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केला आहे. या संदर्भात टिटवाळा पोलीसांनी आरोपी तेरसे विरूद्ध  गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,  कल्याण तालुक्यातील कोंढेरी गावातील  अन्नपूर्णा नगर येथे रहाणार्‍या आरोपी दिपराज तेरसेने याच्या घरी त्याच्या शेजारचा ८ वर्षांचा मुलगा खेळण्यासाठी आला होता. त्याचवेळी आरोपीने त्याचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केले. पीडित मुलाने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला असता त्यांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात (भादविसंक कलम 377 सह लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण  अधिनियम 2012 चे कलम 3,6 प्रमाणे) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

Web Title: An 8-year-old child is unnatural atrocious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.