स्वाइन फ्लूचे शुक्रवारी ८ बळी

By Admin | Updated: March 22, 2015 01:36 IST2015-03-22T01:36:04+5:302015-03-22T01:36:04+5:30

राज्यात स्वाइन फ्लूने शुक्रवारी आठ जणांचा बळी घेतला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३४२वर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक ५८ मृत्यू नागपूर शहरी भागातील आहेत.

8 victims of swine flu Friday | स्वाइन फ्लूचे शुक्रवारी ८ बळी

स्वाइन फ्लूचे शुक्रवारी ८ बळी

पुणे : राज्यात स्वाइन फ्लूने शुक्रवारी आठ जणांचा बळी घेतला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३४२वर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक ५८ मृत्यू नागपूर शहरी भागातील आहेत. शुक्रवारी राज्यातील स्वाइन फ्लूच्या ९७ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
राज्यात १ जानेवारीपासून ३ लाख ८० हजार ५२७ फ्लूसदृश रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३९ हजार ७८८ संशियत रुग्णांना आॅसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले. शुक्रवारी राज्यात १०० नवीन रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)

मुंबईत अजून एक बळी
मुंबई : महाराष्ट्राला हैराण करणाऱ्या स्वाईन फ्लूने शनिवारी अजून एकाचा बळी गेला. या व्यतिरिक्त अजून एका रूग्णाचे निधन झाले असून त्याला स्वाईन फ्लू झाला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत मुंबईबाहेरील २० रूग्णांचा बळी गेला असून मुंबईतील ११ जण याने दगावले आहेत.

Web Title: 8 victims of swine flu Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.