शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर कारागृहातून ८ जणांची सुटका; निकालानंतर मुक्त केले आरोपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:51 IST

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता करताच नाशिक, पुणे, अमरावतीसह नागपूर कारागृहातील १२ कैद्यांपैकी ८ जणांना पर्सनल बाँड घेऊन सोडण्यात आले.

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता करताच नाशिक, पुणे, अमरावतीसह नागपूर कारागृहातील १२ कैद्यांपैकी ८ जणांना पर्सनल बाँड घेऊन सोडण्यात आले. एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर उर्वरित दोन कैद्यांविरुद्ध अन्य खटले सुरू असल्याने त्यांची सुटका झालेली नाही. एक कैदी पॅरोलवर आहे.

साजिद म्हणताे, सगळा तपासच खोटा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो आम्ही निर्दोष आहे. आमचा छळ करत कबुली घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्या गोष्टी ट्रायल कोर्टासमोर होत्या, तरी देखील आम्हाला दोषी ठरवले. माझा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय होता, एवढंच बघून मला यात अडकवले गेले. त्यांनी खोटे पुरावे आमच्या विरुद्ध उभे केले. खरे दोषी भेटले नाहीत म्हणून अडकवले. आज मी नसतो तर दुसरे कुणाला तरी पकडले असते. याप्रकारामुळे आमचे १३ जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे साजिद अन्सारीने सांगितले.  मीरा रोडचा रहिवासी असलेल्या साजिदचे मायानगर येथे मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय होता. जिहादी विचारसरणीकडे आकर्षित झाल्यानंतर तो अन्य अटक आरोपींच्या संपर्कात आला. बॉम्बस्फोट मालिकेसाठी त्याने टाइमर उपलब्ध करून दिले होते. विशेष म्हणजे तंत्रज्ञान अवगत असलेल्या साजिदचा वापर प्रत्येक टप्प्यावर करून घेण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर होता.

कमालला बनावट नोटांच्या तस्करीतही अटक बिहारच्या मधुबनी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या कमाल अन्सारीने स्फोटांसाठी २ पाकिस्तानी अतिरेक्यांना नेपाळमधून मुंबईत आणून सोडले. माटुंगा रोड येथे झालेल्या स्फोटातील बॉम्ब कमाल याने पेरला. चोरट्या मार्गाने पाकिस्तानमध्ये जाऊन शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असा आरोप कमालवर होता. व्यवसायानिमित्त कमालची नेपाळमध्ये ये-जा असे. त्याला या आधी बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणीही अटक झाली होती. विशेष न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगताना २०२१ मध्ये कोरोनाने त्याचा मृत्यू झाला.

कोणत्या कारागृहातून किती आरोपी सुटले?  येरवडा कारागृह     :    २ पैकी १ मुक्त अमरावती कारागृह     : चारही कैदी मुक्त नाशिक रोड कारागृह     : २ पैकी १ मुक्त नागपूर कारागृह     : ४ पैकी २ मुक्त

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबईBombsस्फोटकेBlastस्फोट