गोंदियात बँकेवर ८ लाखांचा दरोडा

By Admin | Updated: May 17, 2017 01:21 IST2017-05-17T01:21:05+5:302017-05-17T01:21:05+5:30

मुरमाडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ग्राहक म्हणून आलेल्या चौघांनी मंगळवारी दुपारी व्यवस्थापकावर गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्यांना न लागता

8 lakhs robbery in Gondia bank | गोंदियात बँकेवर ८ लाखांचा दरोडा

गोंदियात बँकेवर ८ लाखांचा दरोडा

- लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा (गोंदिया) : मुरमाडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ग्राहक म्हणून आलेल्या चौघांनी मंगळवारी दुपारी व्यवस्थापकावर गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्यांना न लागता खिडकीला लागली. या वेळी दरोडेखोरांनी दहशत माजवित बँकेतून आठ लाख रुपये लुटून नेले.
दुपारी जेवणाची सुटी झाल्याने ग्राहक बँकेत नव्हते. हीच संधी साधत चौघांपैकी एकाने देशी कट्टा, दुसऱ्याने पिस्तुल, तर अन्य दोघांनी चाकूचा धाक दाखविला. त्यांना विरोध करणाऱ्या व्यवस्थापक एस. एन. भोंगळे यांच्या दिशेने त्यांनी गोळी झाडली. मात्र, सुदैवाने ती त्यांना लागली नाही. या वेळी दरोडेखोरांनी भोंगळे यांच्यासह त्यांच्या मदतीला धावलेल्या बँक ग्राहक कल्पना राऊत (५२) यांनाही मारहाण केली
आणि बँकेतील ८ लाख लुटून नेले. तसेच तिघांचा मोबाइलही हिसकावून नेला. मंगळवारी या शाखेत भंडाऱ्याहून ६ लाख रुपये आले
होते. दरम्यान, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल
झाला नव्हता.

Web Title: 8 lakhs robbery in Gondia bank